पुणे दिनांक १४ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथील कुंभमेळ्यातून आली आहे.दरम्यान येथे सुरू झालेल्या कुंभमेळ्यात १३२ भाविकांची तब्येत अचानकपणे बिघाडली आहे. दरम्यान या सर्व भाविकांना उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे कडाक्याची थंडी पडली आहे.त्यामुळे काही भाविकांना सर्दी व खोकला तसेच हृदयाबाबतच्या तक्रारी जाणवल्या आहेत.तसेच अमृत स्नान मिरवणुकीत अचानकपणे तब्येत खालावल्याने एका महामंडलेश्वराला सीपीआर देखील देण्यात आला आहे.अशी सूत्रांनद्वारे माहिती मिळत आहे.