पुणे दिनांक १४ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक बीड जिल्ह्यातून अपडेट हाती आली असून.पवन उर्जा कंपनीकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून खंडणी गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडची १४ दिवसांची पोलिस कस्टडी संपली असून त्यामुळे त्याला आज सकाळी ११ वाजता केज येथील न्यायालयात पोलिस हजार करण्यात येणार आहे.सदर खंडणीच्या प्रकरणांत १४ दिवसांच्या पोलिस कस्टडी करण्यात आलेला तपास आज पोलिस न्यायालयात मांडतील दरम्यान मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराडचा संबंध आहे का? हे देखील पोलिसांनी पडताळल्याची माहिती मिळत आहे.त्यामुळे आज न्यायालयात पोलिस आज कोणते मुद्दे मांडणार? हे आता थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल.