पुणे दिनांक १४ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार बीड जिल्ह्यात आता १४ जानेवारी ते २८ जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे.दरम्यान बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणांवरुन बीड जिल्ह्यातील वातावरण दिवसेंदिवस आणखी तापात चालले आहे.त्यामुळे आता जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी यासाठी हा निर्णय तातडीने घेण्यात आला आहे.दरम्यान काल सोमवारी मस्साजोग गावातील नागरिक व सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख काल चांगलेच आक्रमक झाले होते.पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आले होते.