पुणे दिनांक १५ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून.दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर संस्थांकडून वर्तविण्यात आली आहे.दरम्यान पंजाब स्थित खालिस्तानी दहशत वादी हे अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करु शकतात .असा अलर्ट गुप्तचर विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या मागावर असणारे खालिस्तानी कोण आहेत.आणि नेमका त्यांंचा हेतू काय आहे? याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सध्या झेड प्लस सुरक्षा असून त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.