पुणे दिनांक १५ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून.आज बुधवारी त्यांच्या हस्ते मुंबई मध्ये तीन युद्धनौकांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. दरम्यान या नंतर आयएनएस सुरत.तसेच आयएनएस निलगिरी.व आयएनएस वाघशीर या नौदल युद्धनौका देशाला समर्पित करण्यात येईल.दरम्यान याबाबत इंडियन नेव्हीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे.तसेच या तीन युद्धनौका बनविण्यासाठी ७५ टक्के स्वदेशी सामुग्रीचा वापर करण्यात आला आहे.