पिंपरी -चिंचवड दिनांक १५ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळ जनक अपडेट आली असून.पिंपरी -चिंचवड महानगर पालिकेने वाल्मिक कराडला चांगलाच हिसका दिला आहे.दरम्यान पिंपरी चिंचवड येथील वाकड येथील अभिन्यू व्यूह या इमारतीत वाल्मिक कराड यांचा ४ बिएच केचा फ्लॅट आहे.त्याची किंमत ही साडे तीन ते चार कोटी एवढी किंमत आहे.हा फ्लॅट महानगर पालिका जप्त करणार आहे.दरम्यान सदरचा फ्लॅट हा घेतल्यापासून कराडने अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही.वाल्मिक कराड पिंपरी चिंचवड महानगरपालिका ची एकूण १ लाख ५५ हजार रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका अॅक्शन मोडवर आली आहे.सदरचा फ्लॅट जप्त केला जाणार आहे.याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिके च्या वतीने वाल्मिक कराडला नोटीस बजावण्यात आली आहे.