पुणे दिनांक १५ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी हाती आलेल्या अपडेट नुसार पुजा खेडकर हिच्या अटकपूर्व जामिनावर आज बुधवारी दिनांक १५ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालया मध्ये सुनावणी होणार आहे.दरम्यान यापूर्वी तिचा जामीनाचा अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता.त्यानंतर पुजा खेडकर हिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.दरम्यान पुजा खेडकर हिच्यावर चुकीच्या मार्गांचा अवलंब करून आयएएस झाल्याचा आरोप आहे.याबाबत तिला केंद्रीय संघ लोकसेवा आयोगाने बडतर्फ देखील केले होते.तर न्यायालयाकडून २३ डिसेंबर २०२४ पर्यंत पुजा खेडकर हिला अटकेपासून संरक्षण मिळाले होते.