Home Breaking News वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलिस कस्टडी देण्यात आली आहे

वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलिस कस्टडी देण्यात आली आहे

73
0

पुणे दिनांक १५ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती बीड जिल्ह्यातून एक खळबळजनक अपडेट आली असून.वाल्मिक कराड  याला ७ दिवसांची पोलिस कस्टडी सुनावण्यात आली आहे. २२ जानेवारी पर्यंत त्याचा मुक्काम आता बीड येथील जेल मध्ये असणार आहे.दरम्यानच्या कालावधीत सीबीआय व एस‌आयटी वाल्मिक कराड यांची कसून चौकशी करणार आहेत.वाल्मिक कराड याला यापूर्वीच मकोका कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बीड जिल्ह्यातील सत्र न्यायालयाने आज कराडला ७ दिवसांची पोलिस कस्टडी दिल्यानंतर वाल्मिक कराड याच्या अडचणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

दरम्यान बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीड जिल्हा सत्र न्यायालयात युक्तिवाद पूर्ण झाला आहे.न्यायालयाने वाल्मिक कराड याला ७ दिवसांची एस‌आयटी कस्टडी दिली आहे.तो आता २२ जानेवारी पर्यंत एस‌आयटीच्या कस्टडीत असणार आहे.दरम्यान आज बीड जिल्ह्यातील सत्र न्यायालयात कराड याची १० पोलिस कस्टडी मागण्यात आली होती .पण न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची पोलिस कस्टडी दिली आहे.यावेळी सरकार पक्षातर्फे युक्ती वादात एस‌आयटीच्या वतीने न्यायाधीशांसमोर  एस‌आयटीने हत्या प्रकरणात एकूण ९ मुद्दे ठेवण्यात आले आहेत.सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण  करण्यासाठी यातील सर्व आरोपींनी कट रचला तसेच यांची फोनवरून आपसात चर्चा झाली.तसेच देशमुख यांच्या हत्याच्या दिवशी वाल्मिक कराडने सरपंच संतोष देशमुख यांना धमकी दिली होती.हे सर्व संघटीत गुन्हेगारीचे प्रकरण आहे.तसेच एस‌आयटीच्या टीमने यावेळी न्यायालयात सर्व आरोपींची गुन्हेगारांची कुंडली ठेवण्यात आली आहे.यातील आरोपी कृष्णा आंधळे अजून देखील फरार आहे.त्याला लपवण्यात साठी कोणी मदत केली याचा तपास घेण्यासाठी पोलिस कस्टडी गरजेची आहे.असा दावा एस‌आयटीने न्यायालयात केला आहे.तसेच अटक आरोपी मध्ये चाटे व घुले.आणि वाल्मिक कराड यांच्यात कसले संबंध आहे.याचा देखील तपास करायचा आहे.असे एस‌आयटीने न्यायालयात सांगितले आहे.

Previous articleपिंपरी -चिंचवड महानगरपालिकेचा वाल्मिक कराडला झटका?
Next articleचाकण शिक्रापूर रोडवर भरघाव कंटेनरने १० ते १२ गाड्यांना चिरडले, चालक पोलिसांच्या ताब्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here