पुणे दिनांक १६ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट चाकण शिक्रापूर येथून आली असून.भरघाव कंटेनरने १० ते १२ गाड्यांना चिरडल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान यात काहीजणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तर काहीजण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिसांची गाडी या टॅंकरचा पाठलाग करताना या गाडीला देखील चिरडल्यांने काही पोलिस देखील जखमी झाले आहेत.अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान या अपघाता नंतर टॅंकरचा चालक पळून जात असताना नागरिकांनी त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले आहे.तो सध्या शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात आहे.दरम्यान सदर टॅंकरचा चालकाने मद्यप्राशन केल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान या अपघातात किती जणांचा मृत्यू झाला व कितीजण जखमी झाले आहेत.हे अद्याप समजू शकलेले नाही.दरम्यान संतप्त झालेल्या नागरिकांनी या टॅकरची तोडफोड केली आहे.तर अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले आहे.