पुणे दिनांक १७ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.बीड जिल्ह्यातील केज तालुक्या मधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आता सरकारी वकील म्हणून प्रसिद्ध व जेष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक होण्याची शक्यता आहे.दरम्यान या बाबत भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी या बाबत मागणी केली आहे.तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील मागणी केली आहे.तसेच आमदार धस यांनी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची देखील भेट घेतली होती.दरम्यान या सर्व घडामोडीनंतर काल सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तब्बल १५ ते ३० मिनिटे चर्चा केली आहे.अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.त्यामुळे आता मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात सरकारी वकील म्हणून महाराष्ट्र सरकार कधीही विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करु शकते .