पुणे दिनांक १८ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) अभिनेता सैफ अली खान यांच्यावर त्याच्याच निवासस्थानी वांद्रे येथे हल्ला करून फरार झालेला एका संशयिताला मध्यप्रदेश येथील रेल्वेचे RPF ने ताब्यात घेतले आहे.अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान सदर आरोपीला ताब्यात घेण्या साठी मुंबईचे पोलिस रवाना झाले आहेत.दरम्यान या संशयित आरोपीचे नाव आकाश कन्नोजिया असे आहे.
दरम्यान या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एकूण ५० संशयित आरोपींची चौकशी केली आहे.दरम्यान या प्रकरणी मुंबईचे डीजी मनोज यादव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की. मुंबई पोलिस या आरोपीचे लोकेशन ट्रॅक करत होते.दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की सदर आरोपी रेल्वे ट्रेन मध्ये असून सदर ची ट्रेन ही दुर्ग व राजनंद गावाच्या आजूबाजूला आहे. दरम्यान यानंतर पोलिस सिव्हिल ड्रेस मध्ये मुफ्ती या रेल्वे स्टेशन येथून या ट्रेन मध्ये बसले व तसेच दुर्ग येथील पोलिसांनी 👮 या संशयित आरोपीला ओळखले व रेल्वेच्या RPF ने त्याला तब्बल घेतले आहे.अशी माहिती दिली आहे.दरम्यान मुंबईत सैफ अली खानवर 🗡️ चाकूने हल्ला केल्यानंतर आरोपी हा मुंबईतून रेल्वे एक्स्प्रेस ज्ञानेश्वरी मधून बिलासपूरला जात होता.अशी माहिती मिळत आहे.दरम्यान त्याला ताब्यात घेण्यासाठी मुंबईचे पोलिस पथक आजच रवाना झाले आहे.सदरचे पथक हे रात्री दुर्ग येथे पोहोचणार आहे.