पुणे दिनांक १८ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून.महायुतीचे सरकार हे अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार? मग निवडणूक मध्ये त्या ‘आमिशापोटी ‘ त्या बहिणींनी दिलेली मते सुध्दा परत देणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाच्या व महिला व बालविकास कल्याण कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.दरम्यान महायुती सरकारच्या वतीने लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत.दरम्यान या पुढील काळात यातील निकाषांची अति प्रभावी अंमलबजावणी करुन या योजनेतील अपात्र लाडक्या बहिणींना लाभ दिला जाणार नाही.असे देखील यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.