पिंपरी -चिंचवड १८ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच पिंपरी -चिंचवड येथून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.खासगी सावकारांकडून घेतलेलं १३ लाख रुपयांचे कर्ज फेडता न आल्यामुळे व तसेच सावकाराच्या जाचाला कंटाळून पिंपरी चिंचवड येथील चिखलीत राहणाऱ्या कुटुंबाने सामूहिक आत्महत्याचा प्रयत्न केला आहे.यात पत्नी व मुलगा यांचा मृत्यू झाला आहे.तर यात नवरा वाचला आहे.दरम्यान आत्महत्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपा वरुन पोलिसांनी 👮 तीन सावकारांना गजाआड केले आहे.
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 👮 दिलेल्या माहिती नुसार पत्नी शितल हांडे यांनी त्यांच्या भावाला मुंबईला फोन करुन आपण कुटुंबासह आत्महत्या करत असल्याचे सांगितले.त्यानंतर तातडीने नवरा व बायको यांनी १० वर्षाच्या मुलाची गळा आवळून हत्या केली आणि नंतर नवरा व बायको यांनी गळफास लावून घेतला.तर पोलिस घटनास्थळी दाखल झाल्या मुळे नवरा मात्र यातून वाचला आहे.तर पोलिसांनी वैभव हांडे यांच्यावर मुलाचा खून केल्याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.यात पत्नी शीतल हांडे यांचा मृत्यू झाला आहे.या प्रकरणी पोलिसांनी सावरकर १) संतोष कदम २) संतोष पवार ३) जावेद शेख या तीन जणांच्या विरोधात चिखली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.तर यातील चौथ्या आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत.दरम्यान वैभव हांडे व शीतल हांडे हे दोघे नवरा बायको मेडिकलचे दुकान चालवत होते.त्यांनी नंतर दुसरं मेडिकलचे दुकान टाकले होते व त्यासाठी त्यांनी २०१७ मध्ये खासगी सावकार यांच्याकडून कर्ज घेतले होते.व पहिलं कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घेतले व यातच ते कर्जबाजारी झाले.यात त्यांना एकूण १३ लाखांचे कर्ज होते व खासगी सावकार हे त्यांना वारंवार त्रास देत होते . यातच त्यांनी कुटुंबासह आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता.यात पत्नी व मुलगा यांचा मृत्यू झाला तर नवरा हा वाचला आहे. दरम्यान त्यांनी भावाला मुंबईला फोन केल्यावर त्यांने याबाबत तातडीने चिखली पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी वैभव यांचा श्र्वास सुरू होता.त्यांना तातडीने उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले होते.उपचारानंतर त्यांनी या घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली.त्यानंतर पोलिसांनी 👮 खासगी सावकार यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.