पुणे दिनांक १८ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.आता काहीच वेळा पूर्वी राज्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून या मध्ये कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का देण्यात आला आहे.पुणे व बीडच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीच वर्णी लागली आहे.
दरम्यान या प्रमाणे राज्यातील पालकमंत्री असणार आहेत.१) अजित पवार.बीड व पुणे.२) देवेंद्र फडणवीस -गडचिरोली ३) एकनाथ शिंदे -ठाणे ४) पंकजा मुंडे -जालना ५) संजय सिरसाठ – छत्रपती संभाजीनगर.६) आदिती तटकरे -रायगड ७) गिरीश महाजन – नाशिक.८) नितेश राणे -सिंधदुर्ग ९) नरहरी झिरवाळ – हिंगोली १०) प्रताप सरनाईक -धाराशिव ११) उदय सामंत – रत्नागिरी १२) बाबासाहेब पाटील – गोंदिया १३) शंभुराज देसाई – सातारा १४) अतुल सावे – नांदेड १५) मुंबईशहर -एकनाथ शिंदे १६) हसन मुश्रीफ – वाशिम.१७) चंद्रशेखर बावनकुळे – नागपूर व अमरावती १८) आकाश फुंडकर – अकोला १९) गणेश नाईक – पालघर २०) संजय राठोड – यवतमाळ २१ ) आशिष शेलार – मुंबई उपनगर २२) चंद्रकांत पाटील – सांगली या प्रमाणे आहेत.दरम्यान आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा झटका बसला आहे.तर सध्या बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे.तसेच सत्ताधारी व विरोधक आमदार हे धनंजय मुंडे यांच्या कॅबिनेट मंत्री पदाचा राजीनामा मागत आहे.आता यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता पालकमंत्री असल्याने ते बीड मधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निकालात काढणार का ? हे आता लवकरच चित्र स्पष्ट होईल.तसेच बीड मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजित पवार यांनी यापूर्वीच कार्यकरणी बरखास्त केली आहे.आता पालकमंत्री देखील धनंजय मुंडे यांना नाकारण्यात आल्याने हा त्यांना अजित पवार यांनी दुसरा धक्का दिला आहे.