पुणे दिनांक १८ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) वाल्मिक कराडच्या वतीने त्याच्या वकिल यांनी न्यायालयात त्याच्या जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.दरम्यान आज न्यायालयात त्याच्या जामीन अर्जावर आज शनिवारी सुनावणी होणार आहे.अशी माहिती मिळत आहे.दरम्यान वाल्मिक कराडला जामीन देवू नये अशी विनंती एसआयटीने न्यायालया मध्ये केली आहे.न्यायालयाने त्याला जामीन दिल्यास या प्रकरणातील तो पुरावे नष्ट करु शकतो.तसेच अन्य लोकांवर दबाव आणू शकतो.अशी विनंती एसआयटी घ्या वतीने न्यायालयाला केली आहे.तसेच वाल्मिक कराड याला मकोका देखील लावण्यात आला आहे. तसेच या गुन्ह्यातील काही आरोपी हे फरार आहेत. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर कराड हा फरार झाला होता त्याकाळात त्याला कोणी मदत केली हे देखील अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.कराड यांने पुणे येथील सीआयडी कार्यालयात सरेंडर केले होते.आता या बाबत आज न्यायालयात एसआयटी कडून कोण कोणते मुद्दे सरकारपक्षाच्या वतीने मांडले जातात हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.त्यामुळे आता वाल्मिक कराडला बेल का जेल ! हे देखील स्पष्ट होणार आहे.आणि याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.