पुणे दिनांक १९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी एक बीड जिल्ह्यातील परळी येथून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.बीड ते परळी महामार्गावर आज रविवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे.दरम्यान सकाळी परळी महामार्गावर पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तीन तरुणांना भरघाव वेगाने येणाऱ्या एस टी बसने चिरडल्याने तिन्ही तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.त्यामुळे संपूर्ण परळी शहरात व तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच या तरुणांच्या पालकांनी परळी येथील शासकीय रुग्णालयात धाव घेतली आहे.
दरम्यान या अपघातात मृत्यू झालेल्या तीन मुलांची नावे १) बालाजी मोरे २) ओम घोडके ३) विराज घोडके ( सर्व रा.परळी जिल्हा बीड) अशी आहेत. दरम्यान या अपघातानंतर संपूर्ण परळी गावात शुक शुकाट आहे.व सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत. दरम्यान या अपघाताबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे तीन तरुण सकाळी आज रविवारी पोलिस भरतीची तयारी करत असताना भरघाव वेगाने येणारी एसटी बस ही सिमेंटच्या रस्त्यावरून खाली आली व या तीन युवकांना एसटी बसने चिरडल्याने हा अपघात झाला आहे.सदरचा अपघात हा परळी महामार्गावर घोडका राजुरी येथे हा अपघात झाला आहे.यात एसटी बसच्या काचा फुटल्या आहेत.दरम्यान या एसटी बसमध्ये प्रवासी होते का याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.