Home Breaking News प्रयागराज येथे महाकुंभ मेळाव्यात भीषण आग 🔥! सिलेंडरचा फटाके सारखा एकामागोमाग एक...

प्रयागराज येथे महाकुंभ मेळाव्यात भीषण आग 🔥! सिलेंडरचा फटाके सारखा एकामागोमाग एक स्फोट, अनेक तंबू ⛺ जळून खाक

42
0

पुणे दिनांक १९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट प्रयागराज येथील कुंभमेळ्यातून आली आहे.आज रविवारी थोड्याच वेळापूर्वी महाकुंभ मेळाव्यातील तंबूना भीषण अशी आग लागली आहे.दरम्यान या भीषण आगीत २० ते २५ तंबू ⛺ जळून खाक झाले आहेत.दरम्यान आखाड्यासमोरील रस्त्यावरील लोखंडी पुलाखाली ही आग लागली आहे.अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान सदर आगीबाबत सूत्रांन कडून मिळालेल्या माहितीनुसार.प्रयागराज महाकुंभाच्या सेक्टर १९ नगरमध्ये ही आग लागली आहे.अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान महाकुंभ मेळाव्यातील अनेक तंबूना या आगीने वेढले आहे.तसेच तंबूतील सिलिंडरचा फटाक्यांसारखा दनादन स्फोट होत आहे.त्यामुळे या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या आगीत एकूण २० ते २५ तंबू आगीत सामानासह जळून खाक झाले आहेत.आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान हे अथक प्रयत्न करीत आहेत.तसेच तंबू मधील लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.तसेच घटना स्थळी रुग्णवाहिका १० ते १५ दाखल झाल्या आहेत. दरम्यान ही नेमकी कशामुळे लागली तसेच या आगीत किती जखमी झाले हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

Previous articleमस्साजोगच्या सरपंचाची हत्या करणाऱ्यांना फाशीवर लटकवा -मंत्री धनंजय मुंडे
Next articleगोव्यात पॅराग्लायडर दरीत कोसळून दोन जणांचा मृत्यू एक महिला पुण्यातील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here