सैफ अली खान यांच्यावर हल्ला करणारा आरोपी ठाण्यात सापडला, ‘ आरोपी ठाण्यातच पण मुंबई पोलिसांचा संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर वळसा नऊ वाजता मुंबई पोलिसांची पत्रकार परिषद
पुणे दिनांक १९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती सकाळी एक खळबळजनक अपडेट आली असून.अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा शोध मुंबई पोलिस युद्ध पातळीवर घेत होते.सदरचा शोध मुंबई सह इतर राज्यात देखील घेतला जात होता.पण अखेर आरोपी हा ठाण्यातच सापडला आहे.दरम्यान मुंबई पोलिसांचे असं झालं ‘ हातात कळसा व गावभर वळसा ‘ आरोपी ठाण्यातच आणि पोलिसांचा शोध संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यात शोध.दरम्यान आता या प्रकरणी मुंबई पोलिस हे सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेऊन या आरोपींच्या तपासाबाबत माहिती देणार आहेत.
दरम्यान काल मध्यरात्रीच्या सुमारास यातील मुख्य आरोपी ठाण्यातील कासारवडवली भागातून अटक करण्यात आली आहे.सदर आरोपीचे नाव विजय दास असं आहे.ही कारवाई वांद्रे.मुंबई गुन्हे शाखा व स्थानिक ठाणे पोलिसांच्या संयुक्त टीमने कारवाई केली आहे.सदरची आरोपीची अटक ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथील टीसीएस काॅल सेंटरच्या मागे मेट्रो कन्स्ट्रक्शन साइट जवळील लेबर कॅम्प येथून त्याला अटक करण्यात आली आहे.दरम्यान या प्रकरणी आता मुंबई पोलिस थोड्याच वेळात नऊ वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत.दरम्यान चार दिवस या आरोपीला मुंबई पोलिस दलातील २० टीम शोधत होत्या.