पुणे दिनांक २० जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक चाकण येथून एक खळबळजनक अपडेट आली असून.चाकण येथील औद्योगिक वसाहतीत मधील परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे.दरम्यान पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चाकण औद्योगिक वसाहती मध्ये स्टील कंपनीच्या मालकावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.दरम्यान गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव अजय सिंग असे आहे.दरम्यान त्यांच्या पायात एक गोळी तर दुसरी गोळी पाठीत लागली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आले व त्यांनी कंपनीच्या नेटवरुनच रिव्हालवर मधून गोळीबार करण्यात आला आहे. दरम्यान गोळीबार करून हल्लेखोर पसार झाले आहेत.चाकण औद्योगिक वसाहतीत गोळीबाराच्या घटनेनंतर येथे एकच खळबळ उडाली आहे.कामगारा मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.