पुणे दिनांक २० जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली असून.पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाल्यानंतर महायुतीतील वाद आता जगजाहीरपणे चव्हाट्यावर आला आहे.यात शिवसेने ला रायगड व नाशिक या जिल्ह्यातील पालकमंत्री पाहिजे होते.त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज होऊन सातारा जिल्ह्यातील दरे या गावी मुक्कामी गेले आहे.तर दुसरीकडे या नाराजी नाट्य नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही जिल्ह्यांतील पालकमंत्रीपदाला काल तातडीने स्थगिती दिली आहे.तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोसला दौऱ्यावर आहेत.त्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे मंत्री गिरीश महाजन व चंद्रशेखर बावनकुळे हे आता तातडीने सातारा जिल्ह्यातील दरे या गावी रवाना झाले आहेत.आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गिरीश महाजन व बावनकुळे यांची दरे गावी भेट घेतात का हे पहाणे म्हत्वाचे आहे.