पिंपरी -चिंचवड २१ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी पुण्यातून एक अपडेट हाती आली असून.संत साहित्याचे अभ्यासक व वारकरी संप्रदायातील जेष्ठ कीर्तनकार डॉ.किसन महाराज साखरे यांचे सोमवारी निधन झाले आहे. दरम्यान त्यांच्या पार्थिवावर आज पुण्यातील आंळदी येथे अंत्यसंस्कार होतील.साखरे महाराज यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांना काल हृदयविकाराचा झटका आला.व यातच त्यांचे निधन झाले आहे.दरम्यान साखरे महाराज यांनी संस्कृत व मराठी भाषेतून एकूण ११५ ग्रंथ लिहिले आहेत.