पुणे दिनांक २२ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक मुंबईतून मोठी अपडेट आली असून.अभिनेता सैफ अली खानवर 🗡️ चाकूने हल्ला झाल्यानंतर वांद्रे पोलिसांनी 👮 त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानाची झाडाझडती घेतली आहे.या झाडाझडतीत हल्लेखोर मोहम्मद शेहजादची व अभिनेता सैफ अली खान यांच्यात ज्या रुममध्ये झटापट झाली त्याच रुममध्ये वांद्रे पोलिसांना आरोपी मोहम्मद शेहजादची टोपी सापडली आहे.आता हा भक्कम पुरावाच पोलिसांच्या हाती सापडला असून सदरची टोपी आणि त्या टोपीमधील केस डीएन विश्लेषणासाठी न्याय वैद्यक प्रयोगशाळेत पाठविले आहे.तसेच आरोपी शेहजाद याचे १९ ठिकाणचे सैफ यांच्या घरातील बोटांचे ठसे आढळून आले आहेत . दरम्यान कालच लिलावती रुग्णालयातून अभिनेता सैफ अली खान याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.