पुणे दिनांक २२ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पुण्यातील उपनगर येथून एक खळबळजनक अपडेट आली असून.कोरोना.मंकी पाॅक्स HMPV नंतर आता गुइलेन -बॅरे सिंड्रोम ( मेंदू व्हायरस) असा आजार आला आहे.या आजाराची पुण्यातील एकूण २२ जणांना लागण झाल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.त्यामुळे आता आरोग्य व्यवस्था मोठ्या प्रमाणावर अलर्ट मोडवर आली आहे. दरम्यान गुइलेन बॅरे सिंड्रोमचा थेट परिणाम हा नसांवर होतो.शरिरातील स्नायू कमकुवत होतात.व संवेदनाहीन होतात.हातापायाला सुरुवातीला मुंग्या व नंतर अर्धांगवायूचा धोका.तसेच कमी व रक्तदाचा त्रास.व श्र्वास घेण्यास अडथळा येणे.अशा समस्या या व्हायरसमुळे जाणवतात
दरम्यान कोणत्याही प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन झाले असल्यास गुइलेन बॅरे सिंड्रोमची लागण होण्याची शक्यता असते.तसेच रोग प्रतिकारशक्ती कमी असेल तर या आजाराचा धोका वाढतो.हा आजार होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी? तर आपले हात ✋ वारंवार धुवा.तसेच फ्लू बाधित आणि इतर संक्रमित रुग्णांपासून दूर रहा.तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग्य रितीने आहार आणि नियमित व्यायाम करा.तसेच शरिराला वारंवार मुंग्या येत असतील तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.