Home Breaking News पुण्यात चोरट्यांवर राहिला नाही 👮 पोलिसांचा धाक ?

पुण्यात चोरट्यांवर राहिला नाही 👮 पोलिसांचा धाक ?

77
0

पुणे दिनांक २२ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट पुण्यातील कर्वेनगर येथून आली आहे.पुणे शहरात तसेच उपनगरात सर्वत्रच गुन्हेगारीची दिवसांदिवस  मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे.आता कर्वे नगर येथे भरदिवसा एका चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले आहे.दरम्यान हे मंगळसूत्र हिसकावताना त्याचा अर्धा भाग तुटून खाली पडला.तर चोरट्यांने पुढे जाऊन मोटार सायकल वळवून परत येऊन खाली पडलेला अर्धा भाग पुन्हा उचलून नेला आहे.दरम्यान यावेळी चोरट्याच्या चेह-यावर कसलेही दडपण अथवा भीती नव्हती.तसेच आपल्यावर कारवाई होईल ही देखील भीती नव्हती त्यामुळे आता पुण्यात चोरटे बेभान झाले आहेत.  त्यांना पोलिसांचा धाक उरलेला नाही.त्यामुळे आता पुण्यातील या गुन्हेगारीला आळा कधी बसणार असा गंभीर प्रश्न नागरिकांच्या मनात उभा राहिला आहे.

Previous article‘ महाराष्ट्रात तब्बल ५ हजार कोटींचा पिकविमा घोटाळा ‘ आमदार सुरेश धस
Next articleमहायुतीच्या सरकारने खबरदारी घ्यावी -जेष्ठ नेते शरद पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here