पुणे दिनांक २२ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट राजकीय वर्तुळातून आली आहे. महाराष्ट्रात तब्बल ५ हजार कोटी रुपयांचा पिक विमा घोटाळा झाल्याचा दावा भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे.ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोस दौऱ्यावर आहेत.ते दौऱ्या वरुन परतले की मी या महाघोटाळ्या बाबत त्यांची प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना तसे लेखी पत्रच देणार आहे. व या पिकविम्याच्या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना जाहीर केले आहे.दरम्यान या महाघोटाळ्यात सीएससी सेंटरवाले हे फक्त केवळ प्यादे आहेत.एक शेतकरी आठ जिल्ह्यात पिकविमा भरतो.याबाबत कृषी मंत्री यांनी कुठेही समोरासमोर चर्चेला यावे.असे खुलं आव्हान भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी दिले आहे.