पुणे दिनांक २२ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून आली आहे. शिरुर येथे पूर्वी झालेल्या वादातून व्यापा-याच्या छातीवर भरदिवसा बंदूक लावून भरबाजारपेठेत दहशत निर्माण करणा-या व किराणा दुकानदाराला धमकी देऊन फरार झालेल्या युवकाच्या शिरूर पोलिसांनी 👮 आहिल्यानगर येथून मुसक्या आवळल्या आहेत.दरम्यान सदर आरोपीचे नाव कृष्णा वैभव जोशी (रा.सरदार पेठ ता.शिरुर जि.पुणे ) असे आहे.
दरम्यान या प्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी याबाबत दिलेल्या माहिती नुसार सोमवारी हा प्रकार घडला होता.दरम्यान या नंतर शिरूर बाजारपेठेत सरदार पेठेत हा गोळीबार झाला होता.त्यानंतर दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान आरोपी संदेश हा अहिल्यानगर येथून परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पोलिसांनी 👮 अटक केली व त्यांच्याकडून एक पिस्तूल व काही काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.दरम्यान यातील फिर्यादी महेंद्र बोरा यांनी आपल्या विरोधात ४ वर्षांपूर्वी आयकर विभागाकडे लेखी अर्ज दिला असा गैरसमज हा कृष्णा जोशी यांचा झाला होता.व त्यातूनच कृष्णा यांने बंदूकीचा धाक दाखवून बोरा यांना शिविगाळ केली व जीवेठार मारण्याची धमकी दिली.जोशी यांने व्यापारी बोरा यांच्या छातीवर बंदूक लावून खटका ओढण्याचा प्रयत्न केला.यावेळी बोरा यांनी त्याचा हात बाजूला केला असता गोळी फायर होऊन रोडवर पडली दरम्यान यावेळी बाजारपेठेत गर्दी वाढू लागल्यानंतर त्यांने हवेत बंदूकीचा स्ट्रीगर खाली वर करत जोशी निघून जात असताना आणखीन एक गोळी खाली पडली अशी माहिती दिली आहे.दरम्यान जोशी याला आज शिरुर न्यायालयात पोलिसांनी 👮 हजार केले असता न्यायालयाने त्याला दिनांक २४ जानेवारी पर्यंत पोलिस कस्टडी दिली आहे.