पुणे दिनांक २२ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती जळगाव जिल्ह्यातून एक मोठी खळबळजनक अपडेट आली असून.जळगाव येथे पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची आफवा ट्रेन मधील प्रवाशांनी उठवल्यानंतर जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी रेल्वे ट्रेन मधून रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या पण विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या सुपरफास्ट बंगळूरू एक्स्प्रेसने यातील प्रवाशांना चिरडल्याने १० प्रवाशांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे तर यात अन्य ४० प्रवासी हे गंभीररीत्य जखमी झाले आहेत.यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.दरम्यान जळगावचे कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री गिरीश महाजन हे तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत.अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.