पुणे दिनांक २२ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी आलेल्या अपडेट नुसार टोरेस गैरव्यवहार प्रकरणात फरार झालेल्या एकूण ९ परदेशी आरोपींच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 👮 ब्लू काॅर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे.दरम्यान यात एकूण ८ आरोपी हे युक्रेनचे आहेत.तर यातील एक आरोपी हा तुर्कस्थानचा आहे. दरम्यान या गैरव्यवहारातील मुख्य आरोपींपैकी फरार असलेला तौसिफ रियाज उर्फ जाॅन कार्टर याचा अद्याप पोलिसांना अद्याप पर्यंत थांगपत्ता लागलेला नाही.त्यामुळे या आर्थिक गुन्ह्याचा पेच सोडवण्याचा पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.दरम्यान आता पोलिसांनी आरोपी तौसिफ याची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.