पुणे दिनांक २२ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.पोलिसांच्या मारहाणीत मणक्यावर जबरदस्त घाव बसल्याने आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे. असा दावाच वकिल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.दरम्यान घाटी रुग्णालयाच्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये याचा स्पष्ट उल्लेख केला आहे.दरम्यान नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोटी माहिती दिली.ज्या पोलिसांनी 👮 सोमनाथ सुर्यवंशी यांना मारहाण केली.त्यासर्व पोलिस कर्मचारी व अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.तसेच आंबेडकर पुढे म्हणाले की मुख्यमंत्री फडणवीस हे सभागृहातच खोटं बोलत असतील तर राज्याचे काय? असा सवाल देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.