पुणे दिनांक २२ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात असलेल्या वाल्मिक कराडवर दाखल करण्यात आलेल्या मोक्का खटल्या प्रकरणी आज बुधवारी बीड जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे.दरम्यान कराड याची २१ दिवसांची एसआयटीची कस्टडी संपल्यानंतर आज वाल्मिक कराडला मोक्का न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.दरम्यान काल मंगळवारी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील सर्व आरोपींचे एकत्रित असलेला सीसीटीव्ही कॅमेरा 📷 मधील चित्रण आता एसआयटीच्या हाती लागले आहे.त्यामुळे आता या खून खटल्याला वेगळे वळण लागले आहे.तसेच यात आता इतर आरोपी बरोबर त्यांचा मोहरक्या वाल्मिक कराड याच्या बाबत भक्कम असा पुरावाच आता एसआयटीच्या हाती लागलेला आहे.त्यामुळे आता हा पुरावा आज एसआयटीच्या वतीने न्यायालयात दाखल करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यामुळे आज वाल्मिक कराडला पुन्हा एसआयटी कस्टडी मिळते की न्यायालयीन कस्टडी मिळते? हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.