पुणे दिनांक २३ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी एक अपडेट हाती आली असून.काल दुपारी चार वाजण्याच्या सुमारास जळगाव येथे रेल्वे दुर्घटना घडली होती.आता याबाबत पाचोरा शहर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान कलम १९४ अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.रेल्वे पोलिस व महाराष्ट्र पोलिस या रेल्वे दुर्घटना प्रकरणी तपास करणार आहेत.दरम्यान या अपघातात आता प्रर्यत १३ रेल्वे प्रवाशांचा सदर दुर्घटना मध्ये मृत्यू झाला आहे.दरम्यान भरघाव वेगाने येणाऱ्या सुपर फास्ट कर्नाटक एक्स्प्रेसने तब्बल ४० रेल्वे प्रवाशांना उडवण्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.हे सर्व प्रवासी पुष्पक रेल्वे एक्स्प्रेसने प्रवास करत होते. दरम्यान पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची आफवा नंतर प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या होत्या व त्यातच ही भीषण अशी घटना घडली आहे.दरम्यान जखमी प्रवासी यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.