पुणे दिनांक २३ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी एक खळबळजनक अपडेट बीड जिल्ह्यातून आली आहे.मकोका कायद्या अंतर्गत व सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणा मधील आरोपी वाल्मिक कराड याच्या पोटात दुखात असल्याने त्याला रात्री पावणेबाराच्या सुमारास बीड येथील जेल मधून काढून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.दरम्यान त्याच्या वर आयसीयूत उपचार सुरू आहेत.
दरम्यान त्याने रात्रीच्या सुमारास पोटात दुखात असल्य बाबत जेल प्रशासनाला सांगितले.त्यानंतर त्याला रात्री पावणेबाराच्या सुमारास बीड जिल्ह्यातून थेट बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.यावेळी त्याची सोनोग्राफी करण्यात आली.तसेच मधुमेह व रक्तदाबाची देखील तपासणी करण्यात आली आहे.त्याच्यावर आता बीड येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.