पुणे दिनांक २४ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक भंडा-यातून खळबळ जनक अपडेट हाती आली असून.भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगरच्या ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये भयंकर असा स्फोट झाला असून या स्फोटात एकूण ५ कामगारांचा मृत्यू झाला आहे.तर यात अनेक कामगार अडकल्या ची भीती व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान या घटने बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कारखाना मधील आर के सेक्शन मध्ये हा स्फोट झाला असून हा स्फोट एवढा भयंकर होता की.या स्फोटात कारखान्या ची संपूर्ण इमारत पूर्णपणे कोसळली आहे.दरम्यान या स्फोटानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले आहे.यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.