पुणे दिनांक २४ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राज्यातून एक खळबळजनक अपडेट हाती आली आहे.नुकत्याच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान महायुतीतील सर्वच नेत्यांनी म्हटले होते की राज्यात पुन्हा नव्याने आमचे सरकार सत्तेवर आले तर राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी देवू अशी घोषणा केली होती. तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटले होते.पण दरम्यान आता हे सरकार सत्तेवर दुसऱ्यांदा आल्यानंतर कर्जमाफी देण्याला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचा विरोध असल्याची सूत्रांनद्वारे माहिती मिळत आहे.जर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडणार आहे.त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोध केला आहे.तसेच विधानसभा निवडणुकीत प्रचार करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्र्वासन दिले नव्हते असं देखील अजित पवार यांनी म्हटले आहे.