पुणे दिनांक २४ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दक्षिण केरळ व अरबी समुद्रात पुर्वकडून एक सायक्लोनिक सर्क्यूलेशन येत आहे.ते चक्रीवादळात बदलणार का याकडे हवामान विभाग नजर ठेऊन आहे.दरम्यान या सायक्लोनिक सर्क्यूलेशनमुळे वातावरणात बदल होत आहेत.तसेच कोकण किनारपट्टीलगतच असलेल्या जिल्ह्यांमध्ये गारठा गायब होऊन उष्णता वाढत आहे.तर पहाटेच्या वेळी धुक्याची चादर तर दिवसा उन्हाचे चटके बसत आहे.तर मुंबईतील उपनगरात दमट वातावरणामुळे घामाच्या धारा वाहत आहे.तर पुण्यात ढगाळ वातावरण राहणार आहे.