पुणे दिनांक २४ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात खंडणी.जबरी चोरी.तसेच शरीरावर गंभीर दुखापत.असे अनेक गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांनी 👮 तडीपार केले होते.तरी तो पुन्हा पुण्यात येऊन गुन्हे करत होता.नंतर त्याच्यावर पुन्हा लोणी काळभोर पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.दरम्यान सदरची कारवाईची माहिती त्याला मिळाल्यानंतर तो फरार झाला होता.दरम्यान लोणी काळभोर पोलिसांनी त्याला म्हतोबाची वाडी येथील डोंगरावरील एका मंदिरातून अटक केली आहे.दरम्यान मुसक्या आवळलेल्या गुन्हेगाराचे नाव शुभम संजय धुमाळ (वय २३ रा.धुमाळमळा कुंजीरवाडी पुणे) असं आहे.त्याला एक वर्षा करीता पुण्यातून नाशिक येथील कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
दरम्यान आरोपी शुभम धुमाळ याच्या विरोधात लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये व या भागातील विविध पोलिस ठाण्यात खंडणी.तसेच जबरीचोरी व शरिरा वरील गुन्हे दुखापत.यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.एकंदरीत त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता पोलिसांनी 👮 तडीपारचा प्रस्ताव पाठविला होता.दरम्यान तात्कालिन पोलिस आयुक्त आर राजा यांनी २०२४ मध्ये आरोपी शुभम धुमाळ याला एक वर्षा करीता पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते.तरी देखील तडीपारचा आदेशाचा भंग करुन तो लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत होता. म्हणून त्याच्यावर प्रभावी प्रतिबंधक कारवाईची गरज असल्याने लोणी काळभोर पोलिसांनी एम पी डी एचा प्रस्ताव पाठविला होता.दरम्यान पोलिस आयुक्त अमितेश कुमार हा प्रस्ताव मंजूर केला.याची माहिती मिळताच शुभम हा फरार झाला होता.व लपून बसला होता.तो पोलिसांना मिळून येत नव्हता.तसेच त्यांचा कुठेच ठाव ठिकाणा लागत नव्हता.दरम्यान या फरार कालावधीत त्याच्या हातून अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडल्याची शक्यता असल्याने पोलिसांनी 👮 त्याच्या शोधासाठी अनेक स्वतंत्र पथके तयार केली होती. दरम्यान तो म्हतोबा वाडी येथील डोंगरावरील एका मंदिरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली व पोलिसांनी आज शनिवारी पहाटेच्या सुमारास त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.व त्यांची आता थेट रवानगी नाशिक येथील कारागृहात केली आहे.दरम्यान सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त अमितेश कुमार. सहपोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा.अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील.पोलिस उप आयुक्त डॉ.राजकुमार शिंदे.सहाय्यक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले.यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव.पोलिस हवालदार सातपुते.शिंदे.देवीकर.नागलोत.वाघमोडे.भोसले.तसेच पोलिस अंमलदार नरसाळे.ढमढेरे.भोसुरे.वीर.कुदळे . पाटील.शिरगिरे.गाडे.कर्डीले.यांनी केली आहे.