पुणे दिनांक २५ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पुण्यातून राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली असून.पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अनिल भोसले यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान पुण्यातील शिवाजीराव सहकारी बँक घोटाळा प्रकरणाती त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. आज मुंबई उच्च न्यायालयाने माजी आमदार अनिल भोसले यांच्या याचिकेला मंजुरी दिली आहे.भोसले हे मागील ४ ते ५ वर्षांपासून कारागृहात होते.
दरम्यान अनिल भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत होते.ते महाराष्ट्र विधान परिषदेवर सन २०१० ते २०१६ च्या कालावधीत निवडून आले होते.ते पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे अध्यक्ष व संचालक होते.दरम्यान या बॅंकेत बनावट कर्ज प्रकरणां च्या माध्यमातून पैशाचा गैरव्यवहार केला म्हणून अनिल भोसले यांच्यावर आरोप करण्यात आला होता. दरम्यान भोसले व त्यांचे सहकारी यांनी मिळून ७२ कोटी रुपयांचा घोटाळा केला होता.याच आरोपावरून आर्थिक गुन्हे शाखेच्या व ईडीच्या वतीने माजी आमदार अनिल भोसले यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले होते.या दोन्ही गुन्ह्यात त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.