पुणे दिनांक २५ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता एक मराठी चित्रपट सुष्टीतून महत्वाची अपडेट हाती आली असून. महाराष्ट्राचे मराठी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज शनिवारी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.मराठी कला क्षेत्रात अशोक सराफ यांनी उत्कृष्ट रित्या केलेल्या कामगिरीची नोंद घेऊन त्यांना आता सन्मानित केले जाणार आहे.दरम्यान आज एकूण १३९ जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.