पुणे दिनांक २७ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक मुंबईमधून एक अपडेट आली असून.सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या आज सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेणार आहेत.दरम्यान बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी अनेक खळबळजनक खुलासे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आतापर्यंत केले आहेत.व त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी यापूर्वी केली आहे.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याशिवाय सरपंच देशमुख यांच्या हत्याप्रकरणांचा तपास लागणार नाही.अशी भूमिका देखील त्यांनी अनेक वेळा व्यक्त केली आहे.दरम्यान आजच्या पवार यांच्या भेटीत काय चर्चा होणार?हे पहाणे म्हत्वाचे ठरणार आहे.