पुणे दिनांक २८ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून.मुंबई येथे झालेल्या टोरेस घोटाळा प्रकरणात एका युक्रेनियन अभिनेत्याला गजाआड करण्यात आले आहे.मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.सदर अभिनेत्याचे नाव अर्मेन अटाईन असे आहे.दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेता अर्मेन यांने या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात युक्रेनियन सुत्रधाराला मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. दरम्यान या अभिनेत्यांने ‘ सरदार उधम ‘ या विकी कौशलच्या चित्रपटात काम केले आहे.दरम्यान टोरेस घोटाळ्यातील ही आतापर्यंतची सहावी अटक आहे. दरम्यान या घोटाळ्याप्रकरणात दोन दिवसांपूर्वी टोरेसचा सीईओ तौसिफ रियाजला पुणे ग्रामीण लोणावळा येथून मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 👮 अटक केली होती.