पुणे दिनांक २८ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच पुण्यातील न-हे येथून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.पुण्यातील न-हे येथे पेट्रोल चोरीच्या संशयातून एका युवकाचा खून करण्यात आला होता.दरम्यान सदरच्या खूनांनंतर तब्बल दोन महिने फरार असलेल्या माजी उपसरपंच याच्या मुसक्या सिंहगड रोड पोलिसांनी आवळल्या आहेत.दरम्यान या हत्याप्रकरणात सिंहगड रोड पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या माजी उपसरपंच याचे नाव सुशांत कुटे असे आहे.दरम्यान या खूनप्रकरणी पोलिसांनी 👮 १) गौरव संजय कुटे (वय २४ रा.न-हे मानाजी नगर पुणे) २) अजिंक्य चंद्रकांत गांडले ( वय २० रा.मानाजीनगर न- हे पुणे) ३) राहुल सोमनाथ लोहार ( वय २३ रा.मानाजीनगर पुणे) असे आहे.दरम्यान पेट्रोल चोरीच्या संशयातून आरोपींनी समर्थ नेताजी भगत ( वय २० रा.व्यकंटेश्र्वरा सोसायटी.अभिनव काॅलेज रस्ता न-हे पुणे) याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करुन त्याचा खून केला होता.दरम्यान सदरच्या खूनांनंतर समर्थ याचे वडील नेताजी भगत यांनी सिंहगड रोड पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती.दरम्यान यातील आरोपी उपसरपंच सुशांत कुटे हा फरार होता व दरम्यान त्यांने न्यायालयात अटकपूर्व जामीन घेण्याचा देखील प्रयत्न केला होता.न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता.तरी पोलिस स्टेशन मध्ये हजर झाला नाही . दरम्यान सिंहगड रोड पोलिसांनी आज अखेर फरार असलेल्या सुशांतला अटक केली आहे.त्याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कस्टडी दिली आहे.दरम्यान या बाबत सिंहगड रोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाईंगडे व गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी सदरची कारवाई केली आहे.