पुणे दिनांक २८ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती बीड जिल्ह्यातून एक खळबळजनक अपडेट आली असून.बीड जिल्हा हा आता तेथील कुप्रसिद्ध असलेली दादागिरी व तेथील राजकारण्यांचा गुंडांना पाठिंबा.दिवसाढवळ्या होत असलेले खून तसेच बेकायदेशीर रित्या मोठ्या प्रमाणावर युवकांकडे बेकायदेशीर रित्या असलेले रिव्हाॅलवर तसेच राख तसेच वाळूच्या 💸 पैशावर माजलेल्या टोळ्या आता यात पोलिसांचा देखील समावेश आहे.मागील १५ वर्षांपासून एकाच ठिकाणी नेमणूकीस असलेले पोलिस कर्मचारी भास्कर केंद्रे यांच्याकडे १५ जेसीबी तसेच १०० टिपर हे सर्व राख वाहतूकी साठी आहेत .तर एवढेच नाहीतर तेथील मटका व्यावसायिका बरोबर ५० टक्के भागीदारी देखील आहे.असा खळबळजनक दावा आज भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. त्यामुळे आता एवढी माया जमवणां-या पोलिस कर्मचारी भास्कर केंद्रे यांच्यावर नव्याने रुजू झालेले पोलिस अधीक्षक नवनीत काॅवत हे काय कारवाई करणार आहेत.दरम्यान या प्रकरणी आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वाल्मिक कराड याचे बीड जिल्ह्यातील एकूण २२४ पोलिस कर्मचारी यांचे लागेबांधे आहेत.या सर्व पोलिस कर्मचारी यांची मुख्यमंत्री फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत.तिकडे ह्या सर्व पोलिस कर्मचारी यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी केली आहे.असे देखील धस यांनी सांगितले आहे.दरम्यान एका पोलिस कर्मचारी यांने एवढी माया जमवली म्हणून त्यांना भास्कर आता बास कर म्हणण्याची वेळ सर्व सामान्यांवर आली आहे.