पुणे दिनांक २८ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पुण्यातून एक खळबळजनक अपडेट आली असून.शिक्षणाचे माहेरघर पुण्यातील हडपसर भागात वैद्यकीय प्रवेश मिळवून देतो असे आमिष दाखवून तब्बल ४० लाख रुपयांची फसवणूक एका युवतीची केली आहे.दरम्यान या फसवणूक प्रकरणी आता पोलिसांनी 👮 एकूण पाच जणांच्या टोळी विरोधात आता हडपसर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे १) सुनिल कुमार (वय ४५ ) २) सौरभ गुप्ता (वय ४०) ३) विकास गुप्ता (वय २८) ४) रणधीर सिंग (वय ३०) ५) प्रियंका मिश्रा (वय २५ ) अशी संशयितांची नावे आहेत.दरम्यान पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी यांच्या मुलीला एमबीबीएस करायचे होते.यासाठी वैद्यकीय काॅलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो असे सांगून मागील वर्षी ऑगस्टमध्ये एका व्यक्ती मार्फत वरील संशयित आरोपींबरोबर ओळख झाली.त्यांनी आमिष दाखवून चक्क ऑनलाइन माध्यमातून ६०लाख रुपये घेतले.परंतू प्रवेश दिला नाही.त्यावेळी आरोपींकडे पैशाची मागणी केली असता त्यांनी यातील २० लाख रुपये दिले.परंतू उर्वरित ४० लाख रुपयांची रक्कम दिली नाही.व त्यांची फसवणूक केली आहे.याबाबत सदर बाबत ४९ वर्षीय व्यावसायिक हे मगरपट्टा भागात राहत असून त्यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी 👮 गुन्हा दाखल केला आहे.