पुणे दिनांक २८ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे ते अहिल्या नगर रोडवरील वाघोली येथे रोजच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते .आज मंगळवारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार व शिरुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी वाहतूक कोंडीच्या समस्या बाबत तसेच उपाययोजना याबाबत संयुक्त रित्या या भागाची पाहणी केली आहे.
दरम्यान या वाघोली परिसरात सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते.या भागातील नागरिकांच्या वाहतूक कोंडीबाबत मोठ्या समस्या आहेत.दरम्यान सदर समस्यांने या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले असून त्यांनी आपल्या समस्या या भागातील आमदारांकडे तसेच पुणे पोलिस आयुक्तांलयाकडे मांडल्या नंतर आता आज शिरूरचे आमदार कटके व पोलिस आयुक्त अमितेश कुमार तसेच पुणे महानगरपालिका अधिकारी.तसेच पीएमआरडीएचे .पीडब्लूडी.महावितरण.आरटीओ. या सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी वाघोली भागा मधील नागरिकांशी संवाद साधला व त्यांचे समस्या जाणून घेतल्या.संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याची तातडीने पूर्तता करुन घेण्यासाठी सुचना दिल्या आहेत.यावेळी शिरुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी देखील वाघोली परिसरातील नागरिकांच्या वाहतूक कोंडीबाबत समस्या जाणून घेतल्या व संबंधित अधिकारी यांना या भागातील वाहतूक व्यवस्था कशी सक्षम व सुरळीत होईल याकडे तातडीने लक्ष देऊन त्याबाबत उपाय योजना करण्यासाठी सुचना वरील वरिष्ठ अधिकारी यांना दिल्या आहेत.