पुणे दिनांक २८ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक दिल्ली मधून अपडेट आली असून.आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी बाबत सुनावणी होणार आहे.दरम्यान ही सुनावणी सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान सुरू होणार आहे. त्यामुळे आज याबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मागील ३ ते ४ वर्षांपेक्षा अधिक काळापासून महाराष्ट्रात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका रखाडल्या आहेत.तर यावर प्रशासनाच्या माध्यमातून कारभार सुरू असल्याने नागरिकांचे अनेक मुलभूत प्रश्न व सुविधा या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होत नाहीत.असे चित्र राज्यात सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहे.