पुणे दिनांक २९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून.धावपट्टीवरुन उड्डाण करताच विमान क्रॅश झाले असून या दुर्घटनेत २० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.तर ही घटना दक्षिण सुदानच्या युनिटी स्टेट येथे घडली आहे.दरम्यान सूत्रांन कडून मिळालेल्या माहिती नुसार या विमानातून दोन वैमानिकांसह एकूण २१ प्रवासी हे प्रवास करत होते.तेव्हा या विमानाने जुबा येथे धावपट्टी वरुन उड्डाण करताच काही वेळातच युनिटी स्टेट येथील धावपट्टीवरुन ५०० मीटर अंतरावर हे विमान कोसळले दरम्यान या अपघातातून एकच प्रवासी हा बचावला असून दोन वैमानिक व इतर प्रवाशांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.तर या अपघातात दोन चिनी आणि एक भारतीय प्रवाशाचा मृतात समावेश आहे.दरम्यान या विमान दुर्घटना बाबत नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.