पुणे दिनांक २९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट उत्तरप्रदेश मधील प्रयागराजमधील महाकुंभ मेळाव्यातून आली असून.आज बुधवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या चेंगराचेंगरीच्या ३० भाविकांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे.तर उत्तरप्रदेश सरकारच्या हालगर्जीपणा मुळेच या भाविकांचा मृत्यू झाला आहे.आता या घटनेनंतर उत्तरप्रदेश सरकारला जाग आली असून दरम्यान या घटनेत मृत्यू झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केली आहे.दरम्यान या दुर्घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला आहे तर ९० पेक्षा जास्त भाविक हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत. यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे.दरम्यान आता उत्तरप्रदेश सरकारच्या वतीने प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्या मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे.दरम्यान आज बुधवारी पहाटे झालेल्या या दुर्घटना प्रकरणी देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.