पुणे दिनांक २९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.उत्तरप्रदेश मधील प्रयागराजमधील महाकुंभ मेळाव्यात अचानकपणे मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली यावेळी अनेक भावीक खाली पडले व त्या भावीकांना श्र्वास घ्यायला त्रास होऊ लागला.तसेच ही घटना सांगताना या महिलेला रडूच आवरेना दरम्यान ही महिला तिच्या कुटुंबीयांसमवेत कर्नाटक येथून दोन गाड्या करून एकूण ६० भावीक आले आहेत. दरम्यान या महाकुंभ मेळाव्यात त्या कुटुंबातील २ ते ३ लोक सापडत नाही.असे या महिला भावीकाने सांगितले आहे.दरम्यान या महाकुंभ मेळाव्यात झालेल्या चेंगराचेंगरीत १० भाविक हे दगावल्याचे वृत्त समोर येत आहे.दरम्यान प्रशासनाच्या वतीने अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.