पुणे दिनांक २९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक सकाळी खळबळजनक अपडेट प्रयागराज येथील कुंभमेळाव्यातूनआली असून महाकुंभ मेळाव्यातील मौनी अमावस्या निमित्ताने संगम तिरावर लाखो भाविक जमले होते.परंतू या ठिकाणी अचानकपणे चेंगराचेंगरी झाली यात १० भाविकांचा मृत्यू झाला आहे.तर अनेक भाविक हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत.दरम्यान या घटने नंतर प्रयागराजमधील कुंभ मेळाव्यात भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान या घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार आज अमृत स्नानासाठी अनेक भाविक मोठ्या प्रमाणावर आले होते.आज खूपच मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.दरम्यान या चेंगराचेंगरीत १० भाविक यांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी 👮 अनेक भाविक यांना यावेळी मदत केली आहे.दरम्यान सद्य परिस्थितीत यावर पोलिसांनी नियंत्रण आणले आहे. तर सर्व आखाड्यानी अमृत स्नानावर बंदी घातली आहे. त्या मुळे आज बुधवारी अमृत स्नान होणार नाही.दरम्यान कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यांने भाविकांना श्र्वास घ्यायला देखील मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे.त्यामुळे ढकला ढकलली सुरू झाली त्यामुळे काही भाविकांनी बॅरिकेड्स तोडले या मुळे गर्दी मधील भाविक हे सैरभैर झाले व यातच चेंगराचेंगरी झाली यात अनेकजण भाविक गंभीर रित्या जखमी झाले आहेत.तर १० जणांचा मृत्यू झाला आहे.या कुंभमेळ्यात जगातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक आले आहेत.