Home क्राईम मोक्का गुन्ह्यातील ५ महिन्यांपासून फरार ३ आरोपींच्या गुन्हे शाखेचे ४ च्या पथकाने...

    मोक्का गुन्ह्यातील ५ महिन्यांपासून फरार ३ आरोपींच्या गुन्हे शाखेचे ४ च्या पथकाने आवळल्या मुसक्या

    50
    0

    पुणे दिनांक २९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मोक्का गुन्ह्यातील मागील ५ महिन्यांपासून फरार असलेल्या ३ गुन्हेगारांच्या मुसक्या पुणे गुन्हे शाखा ४ च्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. खडकी पोलिस स्टेशन मध्ये या आरोपींविरुद्ध मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा रजिस्टर नंबर २५२/ २०२४ असा आहे.दरम्यान अटक आरोपींची नावे १) अमन राजेंद्र डोके (वय १९ रा. राजीव गांधी नगर खडकी पुणे) २) दीपक राजेंद्र डोके  ( वय २३ रा.राजीव गांधी नगर खडकी पुणे) ३) किरण अनिल खुडे( वय २३ रा.राजीव गांधी नगर खडकी पुणे) असे आहे.

    दरम्यान हे सर्व आरोपी इऑन आयटी पार्क समोरील गिल्ट हाॅटेल मध्ये असल्याची माहिती गुन्हे शाखा ४ च्या पोलिस पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांनी 👮 या तीन जणांच्या मुसक्या आवळल्या व त्यांना खडकी सहायक पोलिस आयुक्त यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.दरम्यान सदरची कारवाई अपर पोलिस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे पोलिस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे.सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे २ राजेंद्र मुळीक तसेच गुन्हे शाखा ४चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय वाघमारे.यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वैभव मगदूम पोलिस अंमलदार जहांगीर पठाण. व विशाल गाडे.विठ्ठल वावळ.प्रविण भालचिम.विनोद महाजन.सुभाष आव्हाड यांनी केली आहे.

    Previous articleआज मौनी अमावस्या महाकुंभ मेळाव्यात १-७५ कोटी लोकांनी केले पवित्र स्नान
    Next articleप्रयागराजमध्ये महाकुंभमेळाव्यात चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू ९० जण जखमी,…अन् नातेवाईकांनी एकच टाहो फोडला

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here